मुंबई – सध्या सर्वत्र ‘भुल भुलैय्या – 3’ची चर्चा रंगली आहे. 2007 ला प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या भुल भुलैय्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर केले आहे. तिच्या मंजुलिका या भूमिकेचा आजही पसंती मिळते. विद्या बालन आता लवकरच भुल भुलैय्या 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कालच भुल भुलैय्या 3 मधील ‘आमी जे तोमार’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्यात तिच्यासोबत दीक्षितही दिसत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला बरीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे.

विद्या बालनने का नाकारला भुल भुलैय्या – 2

भुल भलैय्या 2 विषयी बोलताना विद्याने म्हटलं की, मी घाबरले होते कारण भुल भुलैय्या या सिनेमाने मला बरंच काही दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की, जर माझ्याकडून काही चुकीचं झालं तर कदाचित सगळंच संपेल, म्हणूनच मी ही रिस्क घेऊ शकत नाही, असं मी स्पष्टच अनीसजींना सांगितलं होतं. पण जेव्हा माझ्याकडे तिसऱ्या भागाचं स्क्रिप्ट आलं तेव्हा मलाही ते खूप आवडलं. मला बऱ्याच दिवसांपासून भूषण आणि अनीसजींसोबत काम करायचं होतं आणि त्यासाठी ही योग्य संधी होती.

यावेळी भुल भुलैय्या 3 विषयी विद्या म्हणाली की, या सिनेमात माधुरी मॅम देखील आहेत. त्यामुळे मला वाटतं बरं झालं की, मी ही रिस्क घेतली. खूप छान वेळ गेला. बज्मी हा मनोरंजनाचा राजा आहे. मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.