मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे आज (सोमवार) निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. परचुरे यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. आणि कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती.
अतुल परचुरे यांच्या अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांनी साकारलेल्या पु.ल. देशपांडे यांची भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून ही पोकळी कधीही भरून न येणार नसल्याच्या प्रतिक्रिया सिनेसृष्टीतून येत आहेत.