शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिन येत्या सोमवारी 31 मार्च रोजी असून त्यानिमित्त या दिवशी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींच्या प्रतिमेचे पूजन, नामस्मरण, आरती, पुष्पवृष्टी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते, आमदार डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक दरगू गावडे, पंचगंगेचे संचालक बाबा पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, श्रीदत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत तरी भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब माळी आणि आशुतोष माळी यांनी केले.