देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे २१ जुलै रोजी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन पुण्यवाचन, होम हवन सकाळी १० ते १२ नामस्मरण व ३ दिवसीय नामस्मरण कार्यक्रमाची सांगता. दुपारी १२ ते महाआरती ,१ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान समारंभ, सायंकाळी ५ ते ८ भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी प्रथमच गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून १९ ते २१ जुलै या कालावधीत दोन प्रहरी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळा तीन दिवस होणार आहे. या नामस्मरण कार्यक्रमाची सांगता २१ जुलैला १० ते १२ या वेळात होणार आहे. तसेच याच दिवशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत तसेच मुंबई व स्थानिक कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.