कोल्हापूर( प्रतिनिधी ) : स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी या दिवशी असून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. देशभरातील युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य महेश आवटे यांनी दिली आहे.
कार्यक्रमात संस्थेतून उत्तीर्ण झालेले आणि यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात येत असून माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचांही गौरव करण्यात येणार आहे.
संस्थेमध्ये विविध कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित केले जाणार असून युवा सशक्तीकरण, मानसिक आरोग्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, यशस्वी उद्योजक झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन आणि नेतृत्व विकास यावर चर्चा केली जाणार असल्याचेही प्राचार्य आवटे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.