आजरा (प्रतिनिधी ) : ग्रुप – ग्रामपंचायत कानोली -हारूर येथे 15 लाख रुपयाच्या निधीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यस्थानी सरपंच सुषमा पाटील होत्या. 25/15 योजनेतील विकास कामाचा शुभारंभ भाजप ओ बी. सी. सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांच्या हस्ते झाले. तर दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले,आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करीत आहोत. यापुढेही आम. शिवाजीराव पाटील आणि अशोक आण्णा चराटी यांचे सहकाऱ्यातून निधी देण्याचे आश्वासन दिले, स्वागत आणि प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रा. प सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिपाली सुतार, माया लोहार, यांच्यासह, गजरगाव सरपंच आनंदा कांबळे,सुरेश रेडेकर, विलास सुतार, मिलिंद पालकर, गणपती कळसकर, मारुती कदम,एम. टी. पाटील, प्रकाश पाटील, बाळासो चव्हाण सयाजी सावंत संतोष सावंत, साहिल पाथरवट, दिलीप पाटील, दिनकर पाटील, राजू पाटील, गोपाळ भोगण, रावसाहेब पाटील सी. ए. पाटील उपस्थित होते.आभार सुरेश रेडेकर यांनी मानले.