कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड – अब्दुललाट मार्गावरील लक्ष्मी स्टॉपजवळ घडलेली अपघाताची घटना समोर येत आहे. या अपघातात 3 कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9: 30 च्या सुमारास अब्दुललाटहून हेरवाडकडे बांधकामासाठी कामगार घेऊन निघालेल्या व्हॅन क्र (एम. एच 12, एन.पी. 6593) च्या क्लचमध्ये पिशवी अडकल्याने ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्ता सोडून थेट सुतार मळ्याच्या शेतात पलटी झाली.


अपघातानंतर व्हॅनमध्ये असलेल्या कामगारांनी सावधगिरी बाळगत त्या व्हॅनमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना अब्दुललाट येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.