टोप ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्मान सेना हातकणंगले तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज विविध वरिष्ठांच्या उपस्थित करण्यात आल्या आहेत. यामध्ये टोप गावचे मनसे नेते वैभव सर्जेराव भोसले यांची हातकणंगले उपतालुकाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.
यावेळी हुपरी गावचे मनसेचे पहिले सरपंच व हातकणंगले तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, विभाग अध्यक्ष पद्माकर चौगुले तसेच टोप येथील योगेश पाटील, विजय उत्तुरकर, सतीश पोवार, सूरज चौगुले, सनी तेली, प्रारब्ध पाटील, चैतन्य चव्हाण आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.