कोल्हापूर (प्रतिनिधी) : किल्ले विशाळगड आणि त्यावरील परिसरात तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शाहूवाडी यांनी 4 जानेवारीला अधिसुचना काढलेली आहे. त्या अधिसुचने प्रमाणे येथील दर्गा, देव देवतांची मंदिरे येथे सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत भक्त आणि पर्यटकांना दर्शनासाठी जाणेस परवानगी देणेत आलेली आहे. मात्र, राज्य पुरातत्व विभागाने विशाळगडावर कोणताही ऊरुस, सण, समारंभ साजरे करण्यास मनाई केली आहे.

किल्ले विशाळगडावरील हजरत पीर मलीक रेहान मिरासो या दर्ग्याच्या ऊरूसाचा कार्यक्रम 12 ते 14 जानेवारी रोजी आयोजित केलेला आहे. विशाळगड हा किल्ला राज्य पुरातत्व विभागाचे ताब्यात असून संचालक राज्य पुरातत्व विभागाने 10 जानेवारी रोजी विशाळगड किल्ल्यावर ऊरूस अथवा कोणताही धार्मिक कार्यक्रम,समारंभ करण्यास परवानगी नाकारलेली आहे. त्याप्रमाणे तालुका प्रशासन व पोलीस निरीक्षक शाहूवाडी हे कार्यवाही करीत आहेत.