मुंबई : भारतात पुन्हा एकदा यूपीआय सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे आज सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करु शकत नाहीयेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर युजर्सची गैरसोय होत आहे.

PhonePe, Google Pay आणि Paytm अचानक झालेल्या या बिघाडामुळे याद्वारे देण्या-घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले. UPI सेवा ठप्प पडल्यामुळे, वापरकर्त्यांना पेमेंट करण्यात अनेक अडचणी येत होत्या. किराणा खरेदी असो किंवा मॉलमध्ये बिल भरणे असो, सर्वत्र व्यवहार अडकले आहेत. अनेक लोक कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकले नाहीत. या समस्येबद्दल वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर खूप तक्रारी केल्या आहेत.

दैनंदिन व्यवहारांसाठी या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या वापरकर्त्यांमध्ये वारंवार येणाऱ्या समस्यांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या 20 दिवसांत तिसऱ्यांदा ही युजर्सची गैरसोय होत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये अलीकडे अनेक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे भारतातील वापरकर्त्यांना गैरसोय होत आहे. गेल्या 20 दिवसांत तिसऱ्यांदा या समस्या येऊ लागल्या आहेत.