हातकणंगले ( प्रतिनिधी ): काही दिवसांपूर्वी हातकणंगलेचे प्रथम नगराध्यक्ष कै.अरुण जानवेकर यांचे निधन झाले होते.त्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त होते.काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती.या पदासाठी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

परंतु सर्वांनी आज आपले अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि ही निवड बिनविरोध केली. हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी श्रीमती अर्चना अरुण जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी अर्चना जानवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.