पुणे : बारामती लोकसभेची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत खंत व्यक्त केली आहे.

बहिणीविरोधात मी पत्नीला उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन आज मला सांगतंय, की तसं व्हायला नको होतं, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर आता पुतणे आणि शरद पवार गटाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. काकांबाबत एक मोठा दावा केला आहे. तो निर्णय अजित पवारांचा असूच शकत नाही, दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा हा निर्णय होता असं म्हणत त्यांनी सरळ दिल्लीकडे बोट दाखवलं आहे.

‘तो’ निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली. माझ्या बहिणीविरोधात मी पत्नीला उभं करायला नको होतं. मात्र पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला, की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं, की तसं व्हायला नको होतं”. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

तो निर्णय ‘दादांचा’ असू शकत नाही

त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की , अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काकांची बाजू घेतली आहे .हा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे”.