कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल – हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील असणार्या उद्योजकांच्या उद्योगधंद्याबाबत समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच उद्योजक आणि कामगार वर्ग यांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) या संस्थेच्या संचालक मंडळाची 11 वी सभा मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मॅकच्या सन 2024-2025 या सालाकरिता नूतन पदाधिकारी यांची खालीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी मोहन कुशिरे,उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील,सेक्रेटरीपदी सुरेश क्षीरसागर, ट्रेझररपदी अमृतराव यादव यांची निवड करण्यात आली.या निवडीवेळी मॅकचे मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल,कुमार पाटील आदी उद्योजक उपस्थित होते.