कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – दिवाळीमुळे रखडलेल्या प्रचारला आजपासून जोरदार सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या उध्दव ठाकरें (5 नोव्हेंबर ) यांची कोल्हापूर येथे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली सभा राधानगरी विधानसभा मतदारसंघात होणार आहे.

उध्दव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची आदमापूर या गावी सभा होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार के. पी पाटील यांच्या प्रचारार्थ ते उपस्थित राहणार आहेत.

उद्या तपोवन मैदान येथे महायुतीचा महामेळावा

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोल्हापुरात प्रचाराचा नाराळ फोडणार आहेत. मेरी वेदर ग्राउंड येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी महायुतीचे दहा विधानसभा मतादारसंघातील उमेदवार, राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रचारार्थ तपोवन मैदान येथे उद्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.