मुंबई – सध्या विधानसभा रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मुख्यमंत्री पदावरून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. एकीककडे ठाकरे गट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे शरद पवार यावर आपली वेगळी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या चेहरा माविआचा कोण असणार यावर म्हणाले नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. मविआमधील दोन प्रमुख नेत्यांच्या दोन परस्परविरोधी भूमिका असल्यामुळे भाजपाला आयती टीका करण्याची संधी मिळाली आहे.
“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही” अशी टीका कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.नितेश राणे म्हणाले,“शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना त्यांची लायकी दाखवून दिली. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले. सगळे कार्यक्रम केले, फक्त मुजरा करायचा बाकी राहिलेला. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशी भूमिका घेत असेल, तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान बंद झालय” अशी टीका नितेश राणे यांनी केली. आता नितेश राणे यांच्या या टीकेला ठाकरे गट काय प्रतिक्रया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे,