मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव केली जात आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा म्हणून ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? या चर्चांना उधाण आले आहे. तर ठाकरे यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी विधानसभा निवडणुकीतील रणनीती, जागावाटप आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल’. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र, ‘मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा’, असेही ठाकरे म्हणाले. या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीतील जागावाटपावरही अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘ त्यांना ‘आनंद दिघेंनी हंटरने फोडून काढले असते : संजय राऊत
by
Adeditor18
September 15, 2024
मोठी बातमी : अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..!
by
Adeditor18
September 15, 2024
कोल्हापूर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि.16 सप्टेंबर रोजीच
by
Adeditor18
September 14, 2024