कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला.

हा तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार महेश पाटील आणि महेश खोत यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, दोन अल्पवयीन मुलानी बुलेट गाडी चोरली असून ते या गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटरसायकल घेवून आज हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे गावचे हद्दीतील अॅक्सेल हॉटेल जवळ येणार येणार आहेत. यावेळी तपास पथकाने तिथे सापळा लावून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बुलेट मोटर सायकलसह ताब्यात घेतले.

त्यांच्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यानी ही बुलेट त्यांचा साथीदार स्वप्निल सुनिल नलावडे (वय-19, रा. शाहुनगर, हातकणंगले) याच्या मदतीने चोरली असलेची कबुली दिली. त्यानंतर त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यांनी चोरली आणखीन एक बुलेट, दोन स्प्लेंडर अशा 3 मोटर सायकली जप्त करून त्यांचा साथीदार स्वप्निल नलावडे याला ताब्यात घेतले आहे.