टोप (प्रतिनिधी ) – टोप,पेठवडगांव येथील ट्रेल हंटर्स ग्रुपच्या 13 सायकलवीरांनी आरोग्या साठी व पर्यावरण रक्षणासाठी संदेश देत आषाढी एकादशी निमित्ताने 180 किलोमीटरचे अंतर अवघ्या आठ तासात सायकलवरुन पार करत पंढरीची वारी केली.

तरुणाई मोबाईलच्याआहारी गेल्याने व्यायाम नाही. त्यामुळे तरुणांत व्यायामाची सवय जडावी, मन आणि मनगट बळकट व्हावे, नियमितपणे सायकल चालवल्यास शरीर तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर खांदे व पायाचे स्नायू मजबूत होतात. दररोज सायकल चालवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. सायकल चालवल्यामुळे ताणतणाव, नैराश्य यातून सुटका होते व मानसिक आरोग्य सुधारते. यासाठी टोप किणी पेठवडगांव परिसरातील डॉक्टर, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरूण एकत्र येत टेल हंटर्स ग्रुपच्या माध्यमातून दररोज सकाळी सायकलींग करतात. गोवा, दांडेली, मार्लेश्वर, उदगिरी, कुडाळ, देवबाग,चांदोली अशा विविध ठिकाणीसायकल रॅली केली.

शासनाच्या प्रदूषण महामंडळाच्या सायकल रॅलीचे नियोजन केले होते. पंढरीच्या वारीत आपणही सहभागी होवू या उद्देशाने पेठवडगाव, आष्टा, भिलवडी, तासगांव, भिवघाट, आटपाडी, दिघंची, महुद ते पंढरपूर असा 180 किलोमीटरचा प्रवास 8 तासांत केला. ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविले आहेत.विशेष म्हणजे या सायकल वारीत ईयत्ता 9 वित शिकणाऱ्या निनाद पाटील ने 180 कि मी ची सायकलने वारी पूर्ण केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या सायकल वारीचे आटपाडी ग्रामस्थ येथे स्वागत करण्यात आले.