टोप (प्रतिनिधी) : समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रेलरची धडक बसून हातकणंगले तालुक्यातील टोप येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला. उत्कर्ष सचिन पाटील (वय 18, रा. टोप) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज (सोमवार) दुपारच्या सुमारास शिये फाटा ते कसबा बावडा रोडवर झाला. उत्कर्ष हा खासगी क्लासला बावड्याला जात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष हा १२ वीला असून तो आज दुपारच्या सुमारास कसबा बावडा येथे क्लासला जात होता. यावेळी तो उषा नर्सरीजवळ आला असता त्याला कसबा बावड्याकडून शिये फाटा मार्गे जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने समोरासमोर उत्कर्षच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे उत्कर्ष हा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात उडून पडल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

यावेळी ट्रेलरचालकाने घटनास्थळावरून पळ काढत काही अंतरावर असणाऱ्या शिये फाटा येथील हॉटेल दुर्गामाता जवळ ट्रेलर लावून पोबारा केला. पण घटनेची माहिती नागरिकांना कळताच त्यानी ट्रेलरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे.