मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आहेत. आज (सोमवार) एकीकडे भारतीय शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली तर एकीकडे सोनं-चांदीच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळतेय.
MCX वर आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,090 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 78,550 रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली होती. ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने ग्राहकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहक सोनं खरेदी करु शकतात.