कपिलेश्वर (प्रतिनिधी ) – श्री सद्‌गुरु बाबुमामा फौडेंशन मार्फत श्री अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांचेवतीने श्री बाळूमामांचे जन्मकाळ उत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 26वे रक्तदान शिबीर पार पडले. शिबीराचे उद्‌घाटन श्री बाळूमामांचे मेंडके आणि विश्वस्त श्री. भिकाजी शिणगार रुकडीकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.

श्री बाळुमामांच्या जन्मकाळानिमित्य रक्तदान करणाऱ्यांना चांगले आरोग्य लाभते या भावनेतून प्रतिवर्षी नियमित रक्तदान करणारे शेकडोंच्या घरात आहेत. याही वेळी त्यांनी सहभाग नोंदवला असून 250 जणांनी रकदान शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यावेळी महिला व तरुण युवक यांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आशिर्वाद घोंगडी प्रदान करण्यात आली. श्री. बाळूमामा देवालय आदमापूर कार्याध्यक्ष श्रीमती रागिणी खडके यांचे हस्ते हा समारंभ पार पडला. यावेळी एस. के. पाटील, तंटामुक्त अध्याक्ष एल. जी. पाटील, हनुमान देवालय अध्यक्ष सागर पाटील, बाळूमामा विकास सेवा संस्था मा. चेअरमन नामदेव पाटील, सरपंच विजयराव गुरव प्रमुख उपस्थित होते.