मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईला दुसऱ्या बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचा शेवटचा सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये झाला होता. या सामन्यामध्ये मुंबईने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. आता मुंबईला सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकण्यासाठी दुप्पट रक्कम मिळणार आहे. श्रेयस अय्यरच्या कर्णधार असलेल्या मुंबई संघावर करोडों रुपयांची बरसात होणार आहे.
बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशने 20 षटकांत 174/8 धावा केल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद मिळवल्यामुळे बीसीसीआयने मुंबईला 80 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते. बीसीसीआय प्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनही मुंबई संघाला 80 लाख रुपयांची बक्षीस रक्कम देणार आहे. अशा प्रकारे मुंबई संघाला T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या बक्षीस रकमेच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे. आता संघाला 80 लाखांऐवजी एकूण 1.60 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.