मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. विराटचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा १०० वा सामना असून. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

विराटने ऑस्ट्रेलिायाविरुद्ध खेळताना एकूण २७ कसोटी, ४९ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. विराट असा कारनामा करणारा दुसराच फलंदाज  आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनच्या नावे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना, ११० सामने खेळण्याची नोंद आहे.

तर सचिनने ४९.६८ च्या सरासरीने ६,७०७ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५०.२४ च्या सरासरीने ५,३२६ धावा केल्या आहेत. विराट हा १०० वा सामना ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्यात विराटकडून स्पेशल इनिंगची अपेक्षा क्रिडाप्रेमींना केली आहे.