महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. .

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर म्हणजे अक्षरशः स्वर्गच आहे. मंदिराभोवती असलेले उंच पर्वत आणि विलोभनीय हिरवेगार जंगल शांततेचा विलक्षण अनुभव देतात. मोठ्याने आवाज करत कोसळणारे मोसमी धबधबे सौंदर्यात भर घालतात.

हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे.

मकरसंक्रतील इथं माता पार्वती आणि शिव शंभोचं लग्न लावण्यात येते. इथल्या गुहेत साप, नाग ह्याचे वास्तव्य आहे. पण ते कुणालाही ईजा करत नाहीत.

ह्या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक चालत मारेश्वरच्या दर्शनासाठी जातात. मार्लेश्वरला गेल्यावर प्रथम धबधब्या खाली अंघोळ करून मग मार्लेश्वर चे दर्शन घ्यायचे अशी पद्धत आहे. महाशिवरात्रीला येथे उत्सवासाठी मोठी गर्दी जमते.

गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. तीनही बाजूने उंच डोंगर आहेत. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा ‘धारेश्वर’ ह्या नावाने ओळखला जातो.

असे म्हटले जाते कि ह्या धबधब्या ला एकूण बारा छोटे छोटे धबधबे येऊन मिळतात. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.