नव्वी दिल्ली – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. राज्यातील पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता सगळ्यांचं लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे आहे. अशातच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी थेट पत्रातून निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले सुबोध सावजी..?

सुबोध रावजी पत्रातून म्हणाले, “राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला, तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेन. निवडणूक आयुक्तांना गळा घोटणार”, अशी थेट धमकीच माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र थेट त्यांच्या दिल्ली कार्यालयाला सावजी यांनी पाठवले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री सुबोध सावजी हे आपल्या अनोखे आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.