मुंबई (प्रतिनिधी) : हिना खान ही आघाडीची अभिनेत्री आहे. हिना खानने मालिका मधुन तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. हिना खानचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तर हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जेव्हा – जेव्हा अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट समजते तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसतो. नुकतेच हॉस्पिटलमधून हिनाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती कॉरिडॉरमध्ये फिरत होती आणि तिच्या एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात रक्ताची पिशवी दिसली होती.
हिना खानला अश्या अवस्थेत पाहून चाहते देखील नाराज झाले आहेत. तर हिनाबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. हिना खान आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आता कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारात अभिनेत्रीने मोठे यश मिळवले आहे. या यशानंतर गुगलशी विशेष संबंध आहे. खरं तर आता अभिनेत्रीला केवळ भारतातच नाही तर जगभरातील चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.
आता या प्रेमापोटी अभिनेत्रीचा 2024 च्या गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. या यादीत फक्त 3 भारतीय सेलिब्रिटी दिसले असून त्यापैकी एक हिना खान देखील आहे. हिना खानला या वर्षी गुगलवर खूप सर्च केले गेले आहे कारण तिने ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याची धक्कादायक बातमी दिली. कॅन्सरने त्रस्त असूनही हिना खानमधील सकारात्मकता लोकांना पाहायला मिळाली.