मुंबई ( प्रतिनिधी ) : संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ या वेबसिरीजच्या पहिल्या सीझनने चाहत्यांचे उत्तम मनोरंजन केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान संजीदा शेख यांनी संजय लीला भन्साळीच्या हीरामंडी 2 चे अपडेट दिले आहे. या मालिकेचा दुसरा सीझनही येणार आहे.
हीरामंडीच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी एका मुलाखतीत संजीदा म्हणाली की, हीरामंडीचा आगामी सीझन “मोठा आणि चांगला” असेल, परंतु अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘शूटिंगची टाइमलाइन अद्याप ठरलेली नाही, परंतु सर्व कलाकार मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी तयार आहेत.’ असे त्यांनी सांगितले. हीरामंडी रिलीज झाल्यापासून आयुष्य कसे बदलल्याचही संजीदाने सांगितले. ती म्हणाली, ‘निर्माते तिच्या अभिनयाची प्रशंसा करतात, जे तिला आश्चर्यकारकपणे फायद्याचे वाटते. हीरामंडी वेब सिरीज 2024 मध्ये गुगल ट्रेंडवर सर्वाधिक शोधला गेलेला शो आणि चित्रपट ठरला आहे. यावर आपला आनंद व्यक्त करताना संजीदा म्हणाली की, कलाकारांना त्यांच्या अभिनय, व्यक्तिरेखा आणि शोसाठी ओळख हवी असते आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शोचा भाग बनणे खरोखरच आनंददायी गोष्ट आहे.
हिरामंडी सीझन 1 मध्ये, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, फरदीन खान, शेखर सुमन, शर्मीन सहगल, ताहा शाह आणि संजीदा शेख यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हिरामंडीचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला या मालिकेचा दुसरा भाग लवकरच समोर येत आहे. या मालिकेत काय कथा आले? स्टारकास्ट काय असेल? आणि हा भाग कधी प्रदर्शित होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.