मुंबई : ‘झी मराठी’ वरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तर त्यातील एक मालिका म्हणजे ‘पारू’ असुन सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत काही दिवस आधी या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली होती. त्यामुळे मालिका वेगळ्या वळणावर आली आहे. तर अशातच आता या मालिकेमध्ये एका नव्या आणि भन्नाट पात्राची एन्ट्री होणार आहे.
आता या मालिकेत कोणता अभिनेता एन्ट्री घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागुन राहिली आहे. ‘झी मराठी’ ने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये एक नवा अभिनेता मालिकेत एन्ट्री घेणार आहे. मालिकेत अभिनेता आणि दिग्दर्शक ऋग्वेद फडके हटके अंदाजात एन्ट्री होणार आहे.
‘पारू’ मालिकेतील आदित्य, अनुष्का आणि पारू बाहेर जात असतात आणि नेमका त्याचवेळी त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो. अनुष्का आदित्यला विचारते, “काय झालं? तुला येतो ना टायर बदलता.” त्यावर आदित्य म्हणतो, “आपण याची का काळजी करतोय, आपल्याबरोबर नोकर पारू आहेच की… बदलेल ती” अनुष्का विचारते, “पारूला जमेल टायर चेंज करायला?” आणि अनुष्का आणि आदित्य तिथून निघून जातात.
‘पारू’ गाडीचा टायर कसा बदलायचा? याच्या विचारात असते, इतक्यात एक हॉर्न तिला ऐकू येतो. तो हॉर्न गाडीचा नसून सायकलचा असतो, त्याच्या सायकलवर “प्रेमपुजारी आपलं कामभारी” अशी पाटी लावलेली असते. आता हा प्रेमवीर कोण? हा प्रेमवीर दुसरा-तिसरा कोणीही नसून अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा ऋग्वेद फडके आहे.