मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात थोडा का असेना स्ट्रगल करावा लागतो. मगच त्यानंतर एखाद्याचं नशिब चमकते की ती व्यक्ती परत आयुष्यात कधीच मागे वळून पाहत नाही. असच एका चिमुकल्यानं तरुणपणापासुन इतकं स्ट्रगल केले आहे की त्यानं कुलीचे काम देखील केले त्यानंतर तो कधी कंडक्टर झाला आणि त्यानंतर एका मित्राच्या सांगण्यावरुन तो एक अभिनेता झाला. आणि त्यानंतर त्याने इतकी लोकप्रियता मिळाली की त्यानं सगळ्यांच्याच मनात स्वत:चं स्थान निर्माण केले आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण आहे ?
कधी त्यांची फार बिकट परिस्थिती होती. तर त्यानं तीन-तीन प्रकारची कामे केली आणि आज हाच एक गाजलेला लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानंतर या चिमुकल्याचं नशिब चमकलं आणि तो तमिळ चित्रपटसृष्टीचा ‘थलायवा’ झाला. आज रजनीकांत यांचा 74 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांचा जन्म 1950 मध्ये महाराष्ट्रात झाला होता.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी कर्नाटकात कंडक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. तिकिट देताना त्यांची हटके स्टाईल पाहून त्यांच्या मित्रानं त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानंतर ते मद्रासला येऊन अभिनेता झाले.
रजनीकांत यांचा पहिला चित्रपट हा ‘अपूर्व रागंगल’ होता. त्यांचा हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचवर्षी त्यांचा ‘तूरुपु पडमारगा’ हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला. त्यांची वागणूक आणि स्टाइल त्यासोबत हटके डायलॉग डिलीव्हरीमुळे इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केले आहे. 1978 मध्ये त्यांनी 20 पेक्षा जास्त भूमिकांमध्ये काम केले. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सध्या रजनीकांत हे ‘जय भीम’ चे दिग्दर्शक ज्ञानवेल राजा यांच्यासोबत आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत श्रुती हासन आणि नागार्जुन देखील दिसणार आहेत. रजनीकांत हे याच चित्रपटासाठी 250-300 कोटी घेतात असे म्हटले जात आहे.