टोप (प्रतिनिधी) : टोप गावात दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो. यावेळी अनेकांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार होत आहेत. आज टोप ग्रामपंचायत समोरील बोगद्यात गावातील एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न झाला.पण गळ्यातील मौल्यवान वस्तू तिथेच पडली. यावेळी महिलेने आरडाओरडा सुरू केल्याने चोराने तिथून धूम ठोकली. यावेळी त्या महिलेच्या गळ्याला चोराची नक्खे लागलयाने महिला जखमी झालीय.

यामुळे टोप आठवडी बाजार चोराचा अड्डा झाला आहे का ? पोलिस प्रशासनाची धास्ती कमी झाली का ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. तर ग्रामपंचायत समोरील बोगद्यामध्ये लाईटची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.