रोज सकाळी नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न कायम असतो. त्यासाठी एक चांगला पर्याय पाहूया. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाल्ल्यानं तुमचं शरीर निरोगी राहतं. चला जाणून घेऊया याचे फायदे….
तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आहारात बदल करत असतो…सर्व शरीराला फायदेशीर असा एक घटक म्हणजे हिरवे मूग…हिरव्या मुगाची धिरडी केली जातात. उसळ केली जाते, तसंच मोड आलेले मूगही खाल्ले जातात….यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. मूगामध्ये तंतूमयता म्हणजे फायबर, प्रथिनं, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात आढळतं. ही सर्व पोषक तत्वं चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. हिरव्या मुगामध्ये असलेले हे घटक रक्तदाब नियंत्रण योग्य ठेवणं, हृदयाचे ठोके नियमित राखणं आणि स्नायूंमध्ये येणारे वाक रोखण्यात मदत करतात.
वजन नियंत्रित
शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मूग हा उत्तम पर्याय आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रिकाम्या पोटी मुगाचे सेवन करावे. मोड आलेले मूग प्रथिने आणि फायबरचा एक चांगला स्त्रोत मानला जातो आणि त्यात चरबीचे प्रमाण देखील कमी असते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
अशक्तपणा सुधारतो
शरीरात रक्ताची कमतरता अनेक समस्या वाढवू शकते. अशा परिस्थितीत मूग डाळ फायदेशीर ठरू शकते. मूग डाळीमध्ये लोह असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. दररोज मूठभर मोड आलेले मूग खाल्ल्यास अशक्तपणा दूर होऊ शकतो.
स्नायूंना बळकटी देते
शरीराला बळकट करण्यासाठी मूग डाळीचे सेवनही करता येते. मोड आलेले मुगाचे सेवन स्नायूंसाठी उत्तम असते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने आढळतात, रोज मूग खाल्ल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते.
स्नायूंना बळकटी देते
शरीराला बळकट करण्यासाठी मूग डाळीचे सेवनही करता येते. मोड आलेले मुगाचे सेवन स्नायूंसाठी उत्तम असते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने आढळतात, रोज मूग खाल्ल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते.
डोळे निरोगी
अंकुरलेल्या मुगाचे नियमित रिकाम्या पोटी सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. मूगमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते. यासोबतच डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.