आचार्य चाणक्य हे नीतिशास्त्राचे जाणकार मानले जातात. त्यांची धोरणे अवलंबून अनेक राजांना सत्ता आणि अधिकार प्राप्त झाले. त्यांची धोरणे आयुष्यात यशस्वी व्यक्ती होण्याचे गुण शिकवतात. आचार्य चाणक्य यांची गणना उत्तम विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जातात. आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, मुत्सद्देगिरी आणि समाजशास्त्र या विषयांत जाणकार मानले जातात.
चाणक्य धोरण एखाद्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याची कला शिकवते. चाणक्य यांनी आपल्या एका श्लोकात सांगितले की दारिद्र येण्याआधी हे पाच संकेत आढळतात
- तिष शास्त्रानुसार, चाणक्य नितीमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या अगदी आजच्या काळातही उपयोगी पडतात. अशातच एक गोष्ट म्हणजे काचेचं तुटणे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण घराची काच तुटते तेव्हा हा एक प्रकारचा अशुभ संकेत आहे. चाणक्या नितीनुसार, हे आर्थिक तंगीचा संकेत आहे. यासाठी घरात कोणतंच तुटलेल्या काचेचं सामान ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होतं.
- आपल्या प्राचीन ग्रंथात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेळेआधीच संकटाची चाहून देतात. जसे की, घरात वारंवार भांडणांचं वातावरण असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. फक्त चाणक्य नितीतच नाही तर धार्मिक ग्रंथांतही याचा उल्लेख करण्यात आला आहे. जर घरात विनाकारण वाद होत असतील, घरातील सदस्या एकमेकांवर नाराज असतील तर तुमच्या घरावर आर्थिक संकट येण्याचे हे संकेत आहेत.
- चाणक्यांनुसार, ज्या घरात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर होत नसेल. किंवा ते खुश नसतील तर हे येणाऱ्या आर्थिक संकटांचा संकेत आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळणं म्हणजे त्या घराची प्रगती होणं. पण ज्या घरात मोठ्यांचा सन्मान होत नाही. त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही.
4. ज्या घरात नियमितपणे पूजा-पाठ होत असेल त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील वातावरण आनंदी राहते. पण, जर तुमचं मन पूजा-पाठमध्ये रमत नसेल तर त्या घरावर आर्थिक संकट राहतं.
5. तुळशीच्या रोपाचं सनातन धर्मात फार महत्त्व आहे. घराच्या अंगणात जर तुळशी टवटवीत असेल तर त्याहून चांगली गोष्ट नाही. पण, सुख-समृद्धीचं प्रतीक मानली जाणारी तुळस जर अचानक सुकली असेल तर हे आर्थिक तंगीचं एक कारण ठरु शकतं.