बिग बॉस मराठी हा सध्या सर्वात चर्चेचा आणि ट्रेडिंग विषय आहे. बिग बॉसमध्ये येणाऱ्या भागात काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते. बिग बॉस मराठीच्या घरात आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. बिग बॉसने या आठवड्यात घरातील सदस्यांना बीबी करन्सी मिळवण्यासाठी ‘बीबी फार्म’ हा नवा टास्क दिला.
जान्हवी आणि घन:श्याम मध्ये होणार झटापट
बीबी फार्म टास्कमध्ये प्रतिकात्मक म्हशीच्या दुधाचे संकलन करायचे आहे. जो ग्रुप सर्वाधिक दूध जमवणार तो विजयी होणार आहे. या टास्कमध्ये, मंगळवारच्या एपिसोडमध्ये या टास्कची पहिली फेरी पाहायला मिळाली. या पहिल्या फेरीत वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल एकमेकांना नडले होते.त्याशिवाय इतर सदस्य देखील आक्रमक झाले होते. त्यामुळे बिग बॉस यांनी ही फेरी रद्द केली.त्यांचा हा आक्रमकपणा पाहून ‘बिग बॉस’ सदस्यांना शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार, आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करावे लागणार आहे. त्यानंतर आता आजच्या एपिसोडमध्येही घरातील सदस्यांमध्ये राडा होणार आहे. या राड्यामध्ये जान्हवी किल्लेकर आणि घन:श्याम दरोडे मध्ये झटापट होताना दिसणार आहे. काही नेटकऱ्यांनी टास्कमध्ये खेळ कमी आणि भांडणे जास्त असे अधिक म्हटले. एकाने म्हटले की, कृपया घन:श्यामला जिवंत घरी जाऊ द्या. तर, एकाने म्हटले की, जान्हवीने तर घन:श्यामच्या चिंध्या केल्या. एका युजरने जान्हवीच्या खेळाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.