मुंबई : सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या भावामुळे मध्यमवर्ग चिंतेत आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्याची किंमत जवळजवळ 20 टक्क्यांनी वाढली आहे. गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे. आता काही जाणकार लोक सांगत आहेत की सोन्याच्या दरात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काहींचे तर असेही म्हणणे आहे की सोन्याच्या दर 38% पर्यंत घट होऊ शकते.

लग्नसराई किंवा खासगी वापरासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांना काही वर्षांत मोठा दिलासा मिळू शकतो. अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मॉर्निंगस्टारच्या विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याची किंमत प्रति औंस 1,820 डॉलर पर्यंत खाली जाऊ शकते, जे सध्याच्या पातळीच्या तुलनेत जवळपास 38% कमी असेल. 31 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 89,510 रुपये इतका होता. जर व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाव घटले, तर ते 55,496 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत येऊ शकतात.