नाशिक : मिंध्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र आनंद आश्रमात पैसा उधळून धिंगाणा घातला. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम केलं. आज आनंद दिघे असते तर त्यांनी हे कृत्य करणाऱ्यांना हंटरने फोडून काढलं असतं ,अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शनिवारी नाशिक येथे खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात त्यांच्या आसणासमोर नोटा उधळणाऱ्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो असे संजय राऊत यांनी म्हटलंय. हा उडवलेला पैसा फक्त भ्रष्टाचाराच्या लुटीच्या पैशातूनच आलेला असतो.हा पैसा कुठून आला याची चौकशी करण्यात यावी. स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य मानणारे मुख्यमंत्री आणि अन्य कोण असतील तर त्यांनी यावर भाष्य केलं पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटलंय.
यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर ,उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.