कागल (प्रतिनिधी): कोल्हापुरात गुन्हेगारीचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालले आहे. चोरी, खुणाचे सत्र कायम असलेलं पहायला मिळत आहे. अशीच एक चोरीची घटना समोर येत आहे. म्हाकवे (ता. कागल) येथील तलावाकडील बाजूस असणाऱ्या दादासाहेब पांडुरंग पाटील यांच्या 5 एचपी आणि 3 एचपी अशा 2 विद्युत मोटारी अज्ञात चवट्याने कट्टरच्या साहाय्याने बाहेर कापून लंपास केल्या आहेत.

त्यामुळे दादासाहेब पाटील यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी कागल पोलिसात आपली फिर्याद नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हाकवे परिसरात विद्युत मोटरीच्या चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

म्हाकवे परिसरातील आणि सीमा भागातील अनेक गावातून विद्युत मोटारी आणि त्यांच्या केबल लंपास केल्या जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 2- 3 वर्षापूर्वीही दादासाहेब पाटील यांच्या मोटरीच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या विद्युत मोटरीच लंपास केल्या आहेत. या घटनेनं शेतकरी हवालदिल झाले आहेत.