शिरोळ (प्रतिनिधी) : द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी नुकतीच कोल्हापूर द युवा पत्रकार संघाची स्थापना केली आहे.
कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष सागर शेळके, उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा ,तालुका पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
द युवा पत्रकार संघटनेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी पत्रकार सुभाष गुरव (शिरोळ), उपाध्यक्षपदी पत्रकार कुलदीप कुंभार (कुरुंदवाड) संघटकपदी पत्रकार संदीप इंगळे (शिरोळ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी पत्रकार अग्नेल चव्हाण, संदीप कलिकते, रोहन भिंऊगडे, विजय मोरबाळे, गोरख कांबळे, संजय पाटील, कैयूम शेख, शौकत माणगावे , बाबुराव घुरके, सुभाष भोसले, शौकत मांणगावे, बाजीराव पाटील, इकबाल सनदी, रणजीत पाटील, नारायण लोहार, ईश्वरा गायकवाड, संभाजी चौगुले, सचिन गवळी, अजिंक्य कावनेकर, शितल कांबळे, दीपक पाटील, अजित शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.