कोल्हापूर – स्वतंत्र्य पूर्व काळापासूनची मोठी परंपरा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यामधील महत्त्वाचा असणाऱ्या जळीत सर्व भाग काढण्याच्या मलबा हटवण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झालेआहे.

या क्षेत्रातील अनुभवी ठेकेदार अरबाज झारी आणि त्यांचे 40 सहकाऱ्यांनी हे काम सुरू केले असून त्यासाठी त्यांची आठ लाख पन्नास हजार रुपयाची निविदा महानगरपालिकेने मंजूर केली आहे. हे काम करण्याची तीस दिवसांची मुदत दिली आहे. देखरेखीसाठी चारी बाजूला 9 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच दोन अधिकाऱ्यांच्या समावेत हे काम सध्या सुरू आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहला 8 ऑगस्टला भीषण आग लागली होती. या घटनेला महिनाभर होऊन सुद्धा कामकाजाला सुरुवात झाली नव्हती. अनेक नाट्यप्रेमी व कलाकार यांनी निवेदन दिल्यानंतर अखेर बुधवारपासून संगीत केशवराव भोसले नाटक गृहाच्या आतील बाजूस पडलेला जळीत अवशेषांच्या ढिगारा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम अत्यंत जीकरीचे आहे.

लोखंडी बार कटरने कापावे लागत आहेत. काही ठिकाणी गॅस कटरचाही वापर करावा लागत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यामधील जे साहित्य पूनर्वापर करता येऊ शकतं ते आणि पूर्णपणे बदलले असे दोन ठिकाणी दोन टप्प्यात याची विभागणी केली जात आहे. अस्तित्वात असणार्‍या भिंतीना कसलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या 30 दिवसानंतर पुन्हा एकदा स्ट्रक्चर ऑडिट होऊन पुढील कामातसाठी येणार आहे.