मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला असून महायुती सरकारने सर्वांत जागा जिंकल्या जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर आले आहे. त्याचबरोबर, महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहित समोर येत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.