मुंबई (प्रतिनिधी) : बिग बॉस मराठीच्या घरात राहिलेले स्पर्धकांमुळे बिग बॉसकडे बराच प्रेक्षक वर्ग वळला होता. छोटा पुढारी घनश्याम दरवडे, बिग बॉस मराठी सीझन 5 विजेता सुरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी या स्पर्धकांमुळे बिग बॉस मराठी चांगलाच गाजला होता. प्रत्येक स्पर्धकांने काही ना काही वस्तू खरेदी केल्या. मात्र घनश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारी याने आपल्या मिळालेल्या मानधनातून घेतलेली गोष्ट तुम्हाला माहित आहे का..? चला तर जाणून घेऊयात..
घनश्याम दरवडेने युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून घनश्याम म्हणाला की, सगळेजण मला विचारत होत की, तुला मिळालेल्या पैश्याचं तू काय केल..? आज या पैश्यांबाबतची आनंदाची बातमी सांगतो की, मी त्या पैशांची जागा घेतली आहे. माझी आई, कुटुंबीय आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ही जागा खरेदी करू शकलो. विशेष म्हणजे माझ्या आईला सर्वात जास्त आनंद झाला. आज माझंच नाही तर माझ्या आईचं आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण झालं. श्रीगोंदा येथे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही ही जागा खरेदी केली आहे.
खरेदी केलेल्या जमिनीबद्दल घनश्याच्या आई काय म्हणाल्या..?
घनश्यामच्या आई काय म्हणाल्या की, मला खूपच छान वाटलं. नवीन जागा घेऊन आम्ही ती त्याच्याच नावावर केली. तो मला म्हणालेला आई तुझ्या नावावर ही जागा घेऊ पण मी त्याला म्हटलं की नाही ही तुझी कमाई आहे. त्यामुळे तुझ्या नावावरच ती घ्यायची. आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढे दिवस मोबाईल शिवाय वगैरे राहू शकेल पण तो राहिला आणि त्यामुळे ही जागा त्याचीच असल्याची प्रतिक्रिया घनश्यामच्या आईने दिलेली आपल्याला पहायला मिळत आहे.