कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी आग लागली होती. या आगीमध्ये नाट्यगृहाचे छत, स्टेज जळून पूर्णपणे खाक झाले होते. त्यानंतर नाट्यगृह जसेच्या तसे उभे करावे अशी मागणी करण्यात येत होती.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्यातील कामाला गती आली आहे. सात कोटी रुपयांच्या या कामातून मुख्य इमारतीच्या छताचे नूतनीकरण सुरू आहे. सध्या फब्रिकेटिंग पिठीचे रिस्टीनेशन आणि गिलावा करण्याचे काम सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत छताचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. छताचे सांगाडे बनविण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मी हेरीकॉम कंपनी काम सोपवण्यात आले आहे. सध्या हे काम गतीने सुरू झाले असले तरी जळीत साहित्य काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी गेला. आता प्रत्यक्षात छताचे काम सुरू आहे.