कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – राष्ट्रसेविका समितीतर्फे कोल्हापूर जिल्ह्याचा निवासी वर्ग प्रिन्सेस पद्माराजे शाळेमध्ये संपन्न झाला .या वर्गामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. याशिवाय देशभक्तीपर गीते, खेळ, बोधपर कथा, वेगवेगळ्या विषयावरील बौद्धिके, तसेच चालू घडामोडींवर आधारित चर्चासत्रे,कार्यशाळा इत्यादी आयोजित केलेली असतात ,मन आणि मनगट बळकट करण्यावर या वर्गात भर दिलेला असतो.
यातून मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हा वर्ग बारा वर्षांवरील मुलींसाठी आयोजित केलेला होता. यामध्ये 86 मुलींनी सहभाग नोंदवला .शेवटच्या दिवशी प्रभात फेरीचे आयोजन केले होते .पद्माराजे शाळेतून निघालेली ही प्रभात फेरी ,महाद्वार रोडवरून बिंदू चौकात आली, तेथे कोल्हापूरातील बिंदू चौकाची ऐतिहासिक माहिती सौ अनुजा ताई धरणगावकर यांनी दिली. मिरजकर तिकटी वरून पुन्हा खरी कॉर्नर वरून पद्माराजे शाळेत नेण्यात आली. मुलींनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या अनेक घोषणा, देशभक्तीपर गीते, नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
तसेच या वर्गासोबत ३ दिवसीय घोष प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी सौ स्वरूपा जोशी, सौ देवयानी पलुस्कर ,सौ प्राची लागू यांनी वंशी(बासरी),अनक(ड्रम),पणव(ढोल) यांच्या रचना शिकवल्या .१८ सेविकांनी यात सहभाग घेतला.
हा वर्ग यशस्वी करण्यासाठी विभाग संपर्कप्रमुख मेघा जोशी, प्रज्ञा परांजपे , गौरी मुजुमदार, सौ अनघा नाईक ,स्वस्ति परांजपे यांच्यासह स्थानिक स्वयंसेविरानी विशेष परिश्रम घेतले . समारोपा वेळी पालक आणि हितचिंतकांची उपस्थिती होती .