कोल्हापूर (प्रतिनिधी ): पेठ वडगाव येथील लाटवडे रोड वरील विजयसिंह यादव कॉलेजवर मित्राने 40 मिनिटांपूर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला .त्यानंतर पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळताच क्षणी पोलिसांनी 3 ते 4 मिनिटांमध्येच घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय परिसर रिकामा करत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसर सोडून जाण्यास सांगितले व परिसरात नाकाबंदी केली . दरम्यान वडगाव पालिकेचे अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले .तासाभरातच एसटीएस आणि बॉम्ब शोधक पथक कॉलेज परिसरात बॉम्ब शोधत आहेत .आमदार राजू आवळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली .

बॉम्ब ठेवला असल्याचे कधी समजले …?

लाटवडे रोडवर विजयसिंह यादव महाविद्यालय आणि बळवंतराव यादव ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त इमारती आहेत.यामध्ये डायल 112 ला सकाळी 10 वाजता अमन मकानदार यांनी चार्ज घेतला असता ,अवघ्या 3 मिनिटांमध्येच यादव कॉलेजवर कोणीतरी बॉम्ब ठेवला आहे असे सांगण्यात आले आणि कॉल कट झाला .