मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार असून , पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.परळी येथील कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे .राज्य शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रूपयांचा हप्ता जमा
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देण्याकरिता केंद्र सरकारने विविध योजना सुरु करून त्या अंमलात आणल्या आहेत .त्यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ,या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत.
योजनेच्या अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक, खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा. तुम्ही ती माहिती चुकीच्या पद्धतीने भरल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.योजनेशी संबंधित अपडेटसाठी किसान भाई अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकतात किंवा मग योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव 1800115526 या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.