मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत – पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भूल चूक माफ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा भूल चूक माफ हा चित्रपट 9 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंग देखील सुरू करण्यात आली होती. पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूल चूक माफ हा चित्रपट थिएटरमध्ये नाहीतर ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
या विषयी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. निर्माते म्हणाले,”अलीकडील घडामोडी आणि देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, मॅडॉक फिल्म्स आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज यांनी आपल्या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट ‘भूल चूक माफ’ हा 16 मे रोजी प्राइम व्हिडिओवर जगभरातील प्रेक्षकांसाठी थेट आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. जरी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसोबत चित्रपटगृहात पाहण्यास उत्सुक होतो, तरीही राष्ट्राची भावना सर्वप्रथम येते. जय हिंद.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
