मुंबई : मार्च महिन्यातील भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी जाहीर झाली आहे. या यादीत, दक्षिणेकडील अभिनेत्रींनी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.
भारतातील सर्वात लोकप्रिय महिला
ऑरमॅक्स मीडियानं मार्च महिन्यासाठी भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी जाहीर केली आहे. भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सच्या ताज्या यादीत समंथा प्रभूअव्वल स्थानावर आहेत.यामध्ये बॉलीवूड मधील अभिनेत्रींना मागे टाकत साऊथच्या अभिनेत्रींनी बाजी मारली आहे.
साऊथ च्या कलाकारांचा डंका
बॉलीवूड च्या आलिया भट्ट दुसऱ्या स्थानावर तर दीपिका पादुकोण तिसऱ्या स्थानावर आहे. कतरिना कैफ ही दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण अभिनेत्रींनी बॉलीवूड सारख्या बड्या कलाकारांना मागे टाकत साऊथची काजल अग्रवाल यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर रश्मिका मंदाना पाचव्या क्रमांकावर आहे. साई पल्लवीनं सहावं स्थान पटकावलं आहे आणि त्रिशा कृष्णननं सातवं स्थान पटकावलंय. याशिवाय, नयनतारा आठव्या आणि अनुष्का शेट्टी नवव्या स्थानावर आहे.
अभिनेत्यांची ही बाजी
ऑरमॅक्स मीडियानं भारतातील टॉप 10 अभिनेत्यांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीतही एका दक्षिणात्या अभिनेत्यानं बाजी मारली आहे. टॉप 10 लोकप्रिय स्टार्सच्या यादीत प्रभासचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, थलापती विजय, अल्लू अर्जुन, शाहरुख खान, महेश बाबू आणि अजित कुमार सारख्या स्टार्सची नावे ही या यादीत आहेत.