कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरले असून आज 23 मे रोजी त्यांचे निधन झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी आमदार पीएन पाटील हे घरातच पाय घसरून पडल्याच्या निमित्ताने रुग्णालयात दाखल झाले होते यावेळी त्यांच्या मेंदूला रक्तस्राव झाला असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. यावर राज्यातील नामवंत डॉक्टरांनी कोल्हापूर येथे येत त्यांच्यावर उपचार केले होते.

त्यानंतर काही तास त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र आज पहाटे सहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यामुळे काँग्रेसच्या गोठात मोठी पोकळी निर्माण झाली असून काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता गेल्याची भावना कोल्हापुरातील काँग्रेस वर्तुळात आहे.