मुंबई ( प्रतिनिधी ) : ‘असंभव’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटचा मुहूर्त नैनीताल येथे पार पडला आहे.

हा चित्रपट येत्या 1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.

निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या आगामी सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर अभिनेता सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या यशानंतर हे ‘असंभव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. अभिनेते पुष्कर श्रोत्री या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

मुक्ता बर्वे आणि सचित पाटील हे मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. यांना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. असंभव हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आणि यामध्ये कोण कोण कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.