कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा नादुरुस्त होऊन बंद पडला होता. पाणीपुरवठा नसल्यामुळे गावातील नागरिककाचे हाल होत होते. दत्तवाड पंचायतचे कर्मचारी, नाना कासार, महातेश पटेकरी, अमित वसवाडे यांनी आपल्या जिवाची काळजी न करता, सुमारे अर्धा किलोमीटर महापूरच्या पाण्यातून पोहत जाऊन पाणी पुरवठा सुरू केला.
सदलगा या कर्नाटक हद्दीतून यांनी न थकता आपली कामगिरी यशस्वी पार पडली. पावसाच्या सरी थांबत नव्हत्या तरीसुद्धा यांनी कशाची परवा न करता पाणीपुरवठा सुरळीत केला. तसेच नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने असूनही त्यांनी ही कामगिरी पार पाडली. ही कौतुकास्पद बाब असून गावामध्ये चर्चाचा विषय ठरलेला आहे. गावात यांचे कौतुक होत आहे. सर्व गावकऱ्यांनी यांचे आभार मानले.