सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगळी लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. काँग्रेसचा बालेकिल्ला आणि परंपरील लोकसभा मतदारसंघ असल्याने 2024 च्या निवडणुकीत मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगळी लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. यांनातर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेसचे बांधकहोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तर महाविकस आघाडीकतून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने आपण महाविकस आघाडीच्या उमेदवारा बरोबरच सल्याचे सांगितले होते. तर प्रत्यक्षात पडद्यामागे काही दुसरेच सुरू होते. त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे.
दरम्यान, निवडणूक आटोपल्यानंतर सांगली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याला माजी मंत्री विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थिती लावली. शिवाय काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनीही आपल्या समर्थकांसह या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती? हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकी प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं.विशेष म्हणजे या स्नेहभोजन सोहळ्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने विशाल पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत.
स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची पृथ्वीराज पाटील यांच्याकडून पत्रिका काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवली होती. ज्यामध्ये स्नेहभोजनाचे निमित्त आणि प्रमुख उपस्थिती असणाऱ्या विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे नावांचा उल्लेख होता.

वास्तविक महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचा निवडणुकी दरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं. मग असं असलं तर श्रमपरिहाराच्या स्नेह भोजनाला चंद्रहार पाटलांच्या ऐवजी विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती कशी ? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान या सर्वातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विश्वजीत कदम यांच्या नेतृ्त्वावर आम्ही काम करत आहोत. तर विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे अजूनही उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक राहावे. शिवाय झपाट्याने काम करावे या उद्देशाने हे स्नेहभोजन आयोजित केल्याचेही ते म्हणाले.